बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सहशिक्षक रामा एस. हुलीकोतली (जाधव) यांनी 72 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धा दावणगेरे येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आल्या
होत्या.
शिवठाण (ता. खानापूर) येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून रामा एस. हुलीकोतली कार्यरत आहेत. ते मूळचे मुचंडी (ता. बेळगाव) येथील रहिवासी असून या यशामुळे गावच्या शिरपेचात त्यांनी मानाचा तुरा खोवला आहे. यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी यश मिळविले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









