भाजप खासदाराचा घरचा आहेर
दिल्ली/प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेती क्षेत्रातील पायाभूत विकासासाठी पेट्रोल-डिझेलवर उपकर घेतला जाणार असल्याची घोषणा केली. दरम्यान या उपकरासंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून या दरवाढीला विरोध होत आहे. त्यातच भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला इंधन दरवाढीवरुन घरचा आहेर दिलाय. इंधन दरवाढीवरुन निशाणा साधताना सुब्रमण्यम स्वामी यांनी श्री रामाच्या भारतामध्ये पेट्रोल ९३ रुपये लिटर आहे. सीता मातेच्या नेपाळमध्ये ५३ रुपये लिटर आहे तर रावणाच्या लंकेत ५१ रुपये लिटर पेट्रोल आहे, असा मजकूर असणारा फोटो शेअर केला आहे.
पेट्रोलवर प्रति लिटर अडीच रुपये, तर डिझेलवर प्रति लिटर चार रुपये उपकर आकारला जाणार आहे. मात्र उत्पादन शुल्कात कपात झाल्यामुळे वाढीव अधिभाराचा भुर्दंड मध्यमवर्गाला बसणार नाही, असा दावा सरकारने केला आहे. पेट्रोल आणि डिझेलवरीलमूलभूत उत्पादन शुल्क आणि विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्काचे दर कमी करण्यात आले आहेत. मात्र
सध्या मुंबईसह राज्यातील अनेक शहरात पेट्रोल लिटरमागे ९३ रुपयांपुढे, तर डिझेल ८३ रुपयांपुढे गेले आहे. उत्पादन शुल्कात कपातीनंतर, पंपांवर विक्री केल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे १.४ रुपये आणि १.८ रुपये प्रतिलिटर असे मूलभूत उत्पादन शुल्क आकारण्यात येणार आहे. पेट्रोलवर प्रति लिटर ११ रुपये तर डिझेलवर प्रति लिटर आठ रुपये विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क असेल. ब्रॅण्डेड पेट्रोल आणि डिझेलसाठीही त्याच प्रकारचे बदल करण्यात आले आहेत.









