अभिनेता अक्षय कुमार ‘रामसेतू’ या चित्रपटावरून चर्चेत असतानाच आता त्याच्या नायिकेच्या भूमिकेत जॅकलिन फर्नांडिसची निवड झाल्याचे समजते. रामसेतू हा चित्रपट एकता आणि बंधुभावावर आधारित असणार असून याचे चित्रिकरण अयोध्येत करण्यात येणार आहे. चित्रिकरणाच्या अनुमतीसाठी अक्षय कुमारने यापूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.
जॅकलिन पुढील आठवडय़ापासून जैसलमेरमध्ये ‘बच्चन पांडेय’चे चित्रिकरण सुरू करणार आहे. अक्षय आणि अन्य कलाकारांसोबत चित्रपटातील काही महत्त्वाची दृश्ये तेथे चित्रित करण्यात येणार आहेत.
‘राधे’तही दिसणार जॅकलिन
जॅकलिन सलमान खानसोबत ‘राधे’ चित्रपटातही दिसून येणार आहे. हा चित्रपट ईदच्या वेळी प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर जॅकलिन अटॅक, सर्कस, भूत पुलीस इत्यादी चित्रपटांमये दिसून येणार आहे. अक्षय आणि जॅकलिन यांनी आतापर्यंत हाउसफुल, हाउसफुल-2, हाउसफुल-3, ब्रदर्स या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.









