राधानगरी / प्रतिनिधी
गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये समावेश करावा, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता मिळावा, दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान द्यावे या व इतर मागण्यांसाठी राधानगरी येथील एस टी आगारातील सर्व कर्मचारी कृती समितीच्यावतीने बेमुदत कामकाज गेल्या आठवड्यापासून सुरू असून याचा फटका सर्व सामान्य प्रवाशांना व आगाराला बसला असून या आंदोलनामुळे दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत.
राज्य कृती समितीच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून आगारातील सर्व संघटनाचे सुमारे 335 कर्मचारी यांनी बेमुदत काम बंद केले आहे. गेल्या दोन दिवसापासून सर्व संघटनेचे कर्मचारी आगारच्या गेटवर ठिय्या मांडून बसले आहेत. त्यामुळे दररोजच्या 225 फेऱ्या रद्द झाल्या आहेत व दररोजचे एकूण उत्पन्न 4 ते 4,50 लाख रुपयांचे नुकसान होत आहे.
सद्या एस टी च्या सर्व फेऱ्या रद्द झाल्याने वडाप वाल्यांचा फायदा झाला होत आहे. जेणे करून दररोज कामानिमित्त ये जा करणारे प्रवाशी व विद्यार्थी यांची चांगली कोंडी निर्माण झाली आहे. यावर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊन शासनांमध्ये विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी राधानगरी आगाराचे वाहक, चालक, कार्यशाळा कर्मचारी व प्रशासकीय कर्मचारी यांनी केली आहे.