सावंतवाडी / प्रतिनिधी:
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्या उद्दाम आणि अशोभनीय वक्तव्यामुळे त्यांना झालेल्या अटक आणि जामीन या राजकीय नाट्याचा आता भाजपकडून भावनिक बाजार मांडणे सुरू झालेलं दिसत आहे. बूँद से गयी वो से नही आती, अशी टीका शिवसेनेचे सावंतवाडी दोडामार्ग तालुक्याचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे. नारायण राणे यांची शुगर वाढली, ब्लड प्रेशर वाढलं, राणेंच्या हातातील जेवण हिसकावून घेतले वगैरे भावनिक बाबी सहानुभूतीची भीक मिळवण्यासाठी आता सांगितल्या जात आहेत. पण जनता सुज्ञ आणि सुजाण आहे. कोण काय बोलले आणि कोणाचा अहंकार या सर्व प्रकाराला कारणीभूत आहे हे जनतेने पाहिले आहे. दुसरं म्हणजे न्यायालयाने काल जामीन मंजूर केला म्हणजे जणूकाही निर्दोष मुक्तताच केली अशा थाटात आज भाजप नेते बोलू लागलेले दिसत आहेत, अशी टीकाही परुळेकर यांनी केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









