नाशिक \ ऑनलाईन टीम
नारायण राणे यांना मंत्रिपद दिल्यामुळे भाजप-शिवसेना युतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांना त्यांची क्षमता पाहून मंत्रिपद दिलं असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. चर्चांवर कुठलेही निर्णय होत नसतात अशी प्रतिक्रिया भाजप- शिवसेनेच्या युतीवर दिली आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी शिवसेनेला आव्हान देण्यासाठी राणेंचा मंत्रीमंडळा समावेश केल्यासंदर्भात विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिलं. चर्चांवर कोणतेही निर्णय होत नसतात . वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर चर्चा होत असतात. राणेंना मंत्री बनवताना त्यांच्या क्षमतेचा विचार केला गेला असून बाकी कोणताही विचार केलेला नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत.
महाराष्ट्राला चार लोकांना संधी मिळाली यामध्ये मला अतिशय आनंद आहे. महाराष्ट्राला खाती देखील चांगली मिळाली आहेत. रावासाहेब दानवे यांनाही चांगले खाते मिळाले आहे. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राला चांगली खातील मिळाली असल्यामुळे याचा चांगला फायदा राज्यालाच होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्याच्या सुपुत्रीला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं असल्यामुळे त्यांचेही अभिनंदन आहे. तब्बल ५० वर्षांनंतर नाशिकला मंत्रीपद मिळाले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर ईडीची चौकशी सुरु केली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, या संदर्भात ईडी बोलायचे आहे ते बोलेल, मी काय ईडीचा प्रवक्ता नाही. भारतीय राजकारणात अशा प्रकारचे विनडिक्टिव काम करण्याची कोणतीही प्रथा नाही.
Previous Articleग्रामविकास अधिकारी धनंजय चौकेकर यांचे निधन
Next Article प्रशासनाच्या आदेशानंतरच दुकाने उघडणार








