राज्यात चोरी चुपके चालणारा मटका व्यवसाय सरकारने कायदेशीर करावा जेणेकरून याचा फायदा सरकारला होईल. सरकारने मटका व्यवसायासाठी 12 टक्के कर आकारावा जेणेकरून या व्यवहारातून येणारे पैसे कायदेशीररित्या सरकारच्या तिजोरीत जाईल अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पर्रा येथे बोलताना पत्रकारांना दिली.
पुढे बोलताना मंत्री लोबो म्हणाले की, राज्याचा कानाकोपऱयात मटका व्यवसाय चालतो. या व्यवसायावर बरेच जण आपली रोजी रोटी चालवितात हे जरी खरे असले तरी यापुढे हा चोरी छुपके न होता हा कायदेशीर झाल्यास त्याचा फायदा सरकारलाही होईल. याबाबत पूर्वी अधिवेशनात बरीच चर्चा झाली आहे. मात्र यावर योग्य तोडगा अद्याप झाला नव्हता याबाबत सरकारने फेरविचार करणे तितकेच गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. मंत्री मायकल लोबो यांच्या या वक्तव्याने गोमंतकातील मटका व्यवसाय करणाऱया बुकी तसेच यावर अवलंबून असलेल्या कामगारामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. असे झाल्यास मटका वाल्याकडून मिळणारा हप्ता पोलीस वर्गाला मात्र बंद होणार आहे असे ते म्हणाले.
गोव्याच्या कानाकोपऱयात चोरी छुपे चाललेला मटका व्यवसाय कायद्याच्या बंधनात आणल्यास मोठय़ा प्रमाणात चालेला भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होणार असून त्याद्वारे सरकारला जीएसटी कर मिळण्याबरोबरच अनेकांच्या पोटापाण्याच्या प्रश्न सुटणार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कळंगूटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी केले आहे. मटका व्यवसाय सगळीकडे चालतो आहे त्यामध्ये लाखोंची उलाढाल होत असते. हा व्यवसाय कायद्याच्या चौकटीत आणल्यास त्यापासून सरकार तसेच जनतेचाही फायदा होऊ शकतो असे मंत्री यांनी यावेळी सांगितले.
पॅसिनोत गोमंतकीयांना बंदी आणणे योग्य ठरणार नाही
पॅसिनोमध्ये जुगार खेळण्यास स्थआनिकांना बंदी घालण्याचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मांडला होता. सध्या त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे त्यांनी सांगितले. एखाद्या धनवान गोमंतकीयाची पॅसिनोमध्ये जुगार खेळायची इच्छा झाल्यास त्याला कां बरे अडवून धरावे असा प्रतिप्रश्न मंत्री लोबो यांनी यावेळी केला व या निर्णयाचा पुनर्विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पॅसिनो म्हणजे केवळ जुगारच नसून त्यामध्ये संगीताचाही नजराना सामावलेला असतो. त्याशिवाय लहान मुलां-मुलींसाठी वेगळा कक्ष त्यांच्या मनोरंजनासाठी उभारण्यात आलेला असतो त्यामुळे आपल्या कुटुंबासमवेत पॅसिनोत प्रवेश करू इच्छिणाऱया गोमंतकीयांवर बंदी आणणे योग्य ठरणार नसल्याचे मंत्री लोबो यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना सांगितले.









