शुक्रवारी 1,806 बाधितांची नोंद : सक्रिय रुग्णसंख्या 31,399
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून दिवसभरात आढळून येणाऱया नव्या रुग्णांचे प्रमाण आणखी कमी झाले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. राज्यात शुक्रवारी 1,806 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 2,748 जण संसर्गमुक्त झाले. मृत्यूचे प्रमाणही कमी झाले असून मागील चोवीस तासांत 42 रुग्णांचा बळी गेला आहे.
आरोग्य खात्याने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात शुक्रवारी 1,52,908 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्हिटी दर 1.18 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 28,80,370 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 28,12,869 जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर एकूण 36,079 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या सक्रिय रुग्णसंख्या 31,399 इतकी आहे.









