वार्ताहर / जैतापूर
राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात सध्या बिबट्यांची दहशत आहे.
प्रामुख्याने जंगलात आढळणारा हा प्राणी आता वस्तीत दिसू लागल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील डोंगर, पडवे, विलये या गावांमध्ये गेल्या महिन्याभरात अनेक वेळा बिबट्या निदर्शनास आला आहे. बाकाळे, माडबन, आडिवरे, बुरंबाड, कोंडिवरे परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.