प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य भाजपा ओबीसी मोर्चातर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांनी दिलेली उच्च शिकवण आजच्या पिढीला खूप प्रेरणादायी आहे, असे कर्नाटक राज्य भाजपा ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव म्हणाले.
याप्रसंगी महिला पदाधिकारी प्रियांका कलघटकर, प्रज्ञा शिंदे, रेखा मुचंडी, अमृता कारेकर, आरती पाटोळे, भारती कडेमनी, कांचन कोपर्डे यांनी अभिवादन केले.









