ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशभरात 71 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात पार पडत आहे. राज्यात ठिकठिकाणी ध्वजारोहणाचा सोहळा पार पडत आहे. दिल्लीतील राजपथावर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रमुख सोहळयास ब्राझीलचे राष्ट्रपती जायेर बोलसोनारो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
राजपथावर भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचे, सांस्कृतिक, सामाजिक–आर्थिक प्रगतीचे दर्शन घडवणारे संचलन सुरू आहे. संचलनात 22 चित्ररथांपैकी 16 चित्ररथ हे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आहेत. तर विविध मंत्रालये आणि विभागाचे सहा चित्ररथ सहभागी आहेत.