मुंबई/प्रतिनिधी
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आज ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. ‘माझा डॉक्टर’ या वैद्यकीय परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यामातून रविवारी टास्क फोर्ससह राज्यभरातील डॉक्टरांशी संवाद साधला. संभाव्य तिसरी लाट उपाययोजना आणि राज्याची सज्जता या विषयावर यावेळी त्यांनी संबोधित केलं. राज्यातील कोविड टास्क फोर्सने ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली होती.
कोविड टास्क फोर्सने आयोजित ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाइन वैद्यकीय परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी तसंच उपस्थित डॉक्टरांशी संवादही साधताना त्यांनी राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आणि जनतेला मार्गदर्शनही केलं. यावेळी भाजपने मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनावर त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण करोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचं आहे. असं व्हायला नको.
दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मंदिरं उघडण्याच्या आंदोलनांवरुन विरोधी पक्षांना सुनावलं आहे. ते म्हणाले, अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण करोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचं आहे. असं व्हायला नको.