ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियात कोरोनाबाधितांची संख्या नऊ लाखांवर गेली आहे. मागील 24 तासात रशियात कोरोनाचे 4945 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 130 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियात आतापर्यंत 9 लाख 2 हजार 701 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 15 हजार 260 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
नऊ लाख कोरोनाबाधितांपैकी 7 लाख 10 हजार 298 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 लाख 77 हजार 143 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 2300 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना संक्रमणाच्या बाबतीत रशिया जगात चौथ्या स्थानावर आहे. रशियात आतापर्यंत 3 कोटी 13 लाख नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, या आकडेवारीच्या विश्वासार्हतेविषयी शंका व्यक्त होत आहे.