ऑनलाईन टीम/तरुण भारत
‘रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. तर रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत शंभरहून अधिक सैनिक – नागरिक ठार मारले आहेत.
युक्रेनमधील वादानाचे रुपांतर युद्धात झाले आहे. रशियाकडून हवाई हल्ले सुरु झाले आहेत. रशियाच्या या हल्ल्यात युक्रेनचे शंभरहून अधिक सैनिक – नागरिक मारले गेले आहेत. तर शंभरहून अधिक सैनिक – नागरिक ठार मारले गेल्याच्या वृत्ताला युक्रेनकडून दुजोरा देण्यात आला आहे.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाच्या सल्लागारांनी सांगितले की, शंभरहून अधिक सैनिक -नागरिक ठार झाले आहेत. तर डझनभर जखमी झाले आहेत, अशी माहिती रॉयटरने दिली आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेननेही रशियाला जशाच जोरदार प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे. रशियाची पाच विमाने आणि एक हेलिकॉप्टर आम्ही पाडले, असा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनमधील लुहान्स प्रांतामध्ये आम्ही ही विमाने पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे.