ऑनलाईन टीम / मास्को :
कोरोनावरील लसीवर जगभरातून प्रयत्न सुरु आहेत. अशातच पहिली लस बनवण्याचा दावा रशियाने केला होता. ‘स्फुटनिक – व्ही’ ही लस प्रभावी असून तिला मंजूरी देण्यात आल्याचे रशियाकडून सांगण्यात आले होते. मात्र चाचणी पूर्ण होण्यापूर्वीच लसीला मान्यता दिल्याने संशोधकांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते. अशातच आता रशियाने दुसऱ्या लसीला मंजूरी दिली आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी रात्री याबाबतची घोषणा केली. ‘EpiVacCorona’ असे या लसीचे नाव असून, ही लस सायबेरियातील वेक्टर इन्स्टिट्यूटकडून विकसित करण्यात आली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी या लसीच्या चाचणीच्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यानंतर या लसीला मंजूरी दिली आहे. ही लस सुरुवातीच्या टप्प्यात 100 जणांना देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली आहे. त्यानंतर आता या लसीला मंजुरी देण्यात आलीये.