प्रतिनिधी/ काणकोण
गोवा विधानसभेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्ल अखिल बारतीय आदिवासी संघटनेच्या गोवा शाखेतर्फे काणकोणचे आमदार रमेश तवडकर यांचा आमोणे येथील संस्कृती भवनात सपत्नीक सन्मान करण्यात आला.
या समारंभाच्या व्यासपीठावर आदिवासी कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मधुकर उकइं, सन्माननीय अतिधी म्हणून डॉ. चेतन कुमार मसराम, गोवा शाखेचे अध्यक्ष उपासो गावकर, सरचिटणीस दीपक करमलकर, डॉ. मधु घोडकिरेकर, बलराम शाळेच्या मुख्याध्यापिका सविता तवडकर, श्रीकांत गावकर, मधुकर कुंकळळीकर, रामदास सालेलकर, रंजना बोरकर उपस्थित होत्या.
पारंपारिक दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरूवात केल्यानंतर उपासो गावकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. डॉ. मधू घोडकिरेकर यांनी पाहुण्यांचा परिचय केला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माननीय सभापती रमेश तवडकर यांचा शाल, श्रीफल आणि मानचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
श्री. तवडकर यांनी आदिवासी समाजाला स्वयंपूर्ण बनविण्याचा ध्यास घेतलेला असहून समाजाच्या उन्नतीसाठी महत्वाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळे हे त्यांचे कार्य लक्षात घेऊन आदिवासी समाजाने श्री. तवडकर यांची क्रांतीवीर ही पदवी यावेळी देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी राष्ट्रीय आदिवासी समाजा परिषदेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.









