160 टन बियाण्यांचे यावर्षी उत्पादन : रत्नागिरी-शिरगाव कृषी संशोधन केंद्रातून गतवर्षीच्या तुलनेत 28 टन विक्रमी उत्पादन : कणकवली-सावंतवाडी संघाकडून प्रत्येकी 2 टनाची मागणी
अजय कांडर / कणकवली:
कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी-शिरगाव संशोधन केंद्राने तयार केलेल्या रत्नागिरी 8 भात बियाण्याची देशातील सहा राज्यांसाठी शिफारस करण्यात आली आहे. यावर्षी या जातीचे तब्बल 160 टन बियाणे तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कृषी संशोधन केंद्राने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी विविध भात बियाण्यांचे 28 टन विक्रमी उत्पादन घेतले आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात या कृषी हंगामासाठी या पेंदातून कणकवली आणि सावंतवाडी खरेदी-विक्री संघाने प्रत्येकी 2 टन भात बियाण्यांची मागणी केली.
कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध कृषी संशोधन केंद्रातून विविध भात बियाण्यांचे संशोधन करण्यात येते. उत्पादनही केले जाते. यात रत्नागिरी-शिरगाव कृषी संशोधन केंद्राने महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यामुळेच यावर्षी शिरगाव कृषी संशोधन केंद्राने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 28 टन भात बियाण्यांचे विक्रमी उत्पादन केले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी संशोधन केंद्राने तयार केलेल्या विविध भात बियाण्यांपैकी रत्नागिरी-8 (सुवण्<ाा&-मसुरा) जातीचे 160 टन बियाणे तयार केले. या जातीला तेलंगणा, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओरिसा या सहा राज्यांनी शिफारस केली आहे.
परजिल्हय़ातीलही शेतकऱयांची मागणी
यावर्षी जिल्हा व परजिल्हय़ातील शेतकऱयांनी बियाण्याची मागणी या केंद्राकडे केली. राज्यातील बीज कंपन्यांनाही संशोधन केंद्राकडे बियाण्यांची मागणी केली होती. जिल्हय़ातील अनेक शेतकऱयांनी सुधारित भात जातीच्या लागवडीचे नियोजन केले आहे. कृषी संशोधन केंद्राकडे भाताच्या रत्नागिरी 24, रत्नागिरी 73, रत्नागिरी 711, रत्नागिरी 1, रत्नागिरी 4, रत्नागिरी 3, रत्नागिरी-8, कर्जत 6, कर्जत 5 आणि समुद्र सपाटीचा भाग असल्यामुळे खार जमिनीसाठी पनवेल-1, 2, 3, या जातींना दरवर्षी वाढती मागणी आहे.
मागणी तसा पुरवठा
शिरगाव संशोधन केंद्रातून ‘मागणी तसा पुरवठा’ यावर भर देऊन गतवर्षीच्या 22 टन भात बियाण्यांच्या तुलनेत यावर्षी या केंद्राने 33 टन बियाण्यांचे विक्रमी उत्पादन केले. त्यातील 28 टन बियाणे केंद्रातून वितरित करण्यात आले. यावर्षी सावंतवाडी-2 टन, राजापूर-1 टन, लांजा-दीड टन, कणकवली-2 टन, खेड- दीड टन, चिपळूण-अडीच टन, पोलादपूर-2 टन, महाड-500 किलो, दापोली 1 टन अशी बियाण्यांची विक्री झाली आहे. यावर्षी संशोधन केंद्राने इतर केंद्रांच्या तुलनेत 33 टन भात बियाण्यांचे विक्रमी उत्पादन केले. त्यापैकी 28 टन भात बियाणे शेतकऱयांसह राज्यातील विविध भात बियाणे कंपन्यांना देण्यात आले.
कणकवली संघात 500 किलो बियाणे शिल्लक!
कणकवली खरेदी-विक्री संघ दरवर्षी तालुक्यात शेतकऱयांना पुरेसे एवढे भात बियाणे मागवित असते. शेतकऱयांची बियाण्यांची आबाळ होऊ नये, असा त्या मागे उद्देश आहे. यावर्षी शिरगाव संशोधन केंद्रातून मागविलेल्या दोन टनपैकी सध्या 500 किलो भात बियाणे शिल्लक असल्याची माहिती संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई यांनी दिली.









