प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे चाचण्याचे प्रमाण घटले आहे. आज करण्यात आलेल्या ९३ कोविड चाचण्यांपैकी केवळ १८ रुग्ण आढळले तर एका कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार २३३ वर पोहोचली आहे.
आज ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे जिल्हयातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ हजार ५७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी ९२.०१ इतकी नोंदवली गेली आहे. लांजा येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ३०५ वर पोहोचली आहे. मृत्यांची टक्केवारी ३.७० इतकी नोंदवण्यात आली आहे.
आरटीपीसीआर
चिपळूण ४
रत्नागिरी १०
खेड २
एकूण १६
रॅपिड अँटीजन टेस्ट
चिपळूण १
रत्नागिरी १
एकूण २