प्रतिनिधी/रत्नागिरी
जिह्यात संचारबंदी लागू असताना देखील अनावश्यक रित्या फिरणाऱयांना गुरूवारी पोलिसांकडून चांगलाच दणका देण्यात आल़ा काही तरी निमित्त काढून रस्त्यावर घिरटय़ा मारणाऱया 40 जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतल़े त्यांना मारूती मंदीर येथील शिवाजी स्टेडीयममध्ये 1 तास डांबून ठेवत पोलिसांकडून समज देण्यात आल़ी
कारोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी करण्यात आली आह़े तसेच नागरिकांनी घरातच थांबावे असे आवाहन करण्यात आले आह़े मात्र असे असताना देखील काही अतिउत्साही लोक संचारबंदी उठल्याच्या अर्विभावात रस्त्यावर फिरताना दिसून येत होत़े जिल्हाभरात देखील विविध तालुक्यात मॉर्निंगवॉकला बाहेर फिरणाऱयांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होत़ी
रत्नागिरी शहर परिसरात देखील अशा प्रकारे सकाळी मार्निंग वॉकला फिरणाऱयांची संख्या लक्षणिय होत़ी शुक्रवारी सकाळी पोलिसांकडून शहरात गस्त घालून रस्त्यावर फिरणाऱयांवर कारवाई करण्यात आल़ी









