केंद्रीय मंत्र्यांची पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठीनागपूरलापसंती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या अनेक वर्षापासून रत्नागिरीतील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रकल्प (आरपीसी) राजकीय अनास्थेमुळे रखडलेला आहे. या बाबत केंद्रीय वाहतूक व परिवहन मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांना पत्र लिहून हा प्रकल्प नागपूरमध्ये झाल्यास मिळणारे फायदे अधोरेखित केले आहेत.
राजापूर-रत्नागिरी येथील नियोजित प्रकल्पासाठी जमिनीच्या उपलब्धतेबाबत महाराष्ट्र सरकारला आपली भूमिका मांडण्यास सांगण्यात आले असून राज्याच्या निर्णयाची पेट्रोलियम सरकारला अद्यापही प्रतीक्षा आहे. मात्र याला एकूण किती वेळ लागेल, हे अनिश्चित आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी हवाई, रेल्वे यांनी जोडलेल्या व देशाच्या शून्य मैलांवर असलेल्या नागपूरला प्राधान्य देणारा प्रस्ताव आपण मांडू शकतो, असेही गडकरी यांनी सांगितले. याच्या वितरणासाठी पाईपलाईनचा पर्याय उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अशा प्रकल्पांसाठी मोठी जागा लागते. महाराष्टातील पंचतारांकित बुटीबोरी औद्योगिक वसाहत परिसरात सर्व सुविंधासह हजारो एकर जमीन उपलब्ध आहे. गडकरी म्हणाले की, पेट्रोलियम मंत्र्यांनी त्यांच्या बैठकीत नागपूर शहराजवळ योग्य जमीन उपलब्ध करून दिल्यास नागपुरात रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारता येईल, असे आश्वासन दिले आहे. केंद्रिय मंत्री गडकरी यांनी नागपूरचा प्रस्ताव देण्याची चर्चा सुरु केल्यने रत्नागिरी जिह्यातील प्रस्तावित प्रकल्पाचे काय होणार, याबद्दल नागरिकांसह राजकीय स्तररावरही चर्चा सुरु होणे स्वाभाविक आहे.
…









