प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात रविवारी राजीवडा येथील एका कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा आयसीयुमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही माहिती नातेवाईकांना कळताच त्यांनी आयसीयुमध्ये जावून या पॉझिटिव्ह रूग्णाचा मृतदेह ताब्यात घेतला यावेळी परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱयांना विरोध केला असता 30 ते 40 जणांचा समूहाने याकडे दुर्लक्ष करत मृतदेह प्रकियेनुसार घेवून जाता तसाच नेवून अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोना रूग्णांवर व्यवस्थित उपचार प्रणाली केली जात असताना केवळ गैरसमजातून रविवारी रात्री हा प्रकार घडला. आम्ही नातेवाईकांना खूप समाजावण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने या समूहासमोर आम्हाला काही करता आले नसल्याची माहिती शासकीय रूग्णालयाकडून देण्यात आली. या प्रकारानंतर कोरोना योध्दा म्हणून काम करणाऱया वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने नातेवाईकांमधील गैरसमज वेळेत दूर करणे आवश्यक असल्याची मागणी वैद्यकीय अधिकाऱयांनी केली आहे.
Previous Articleफ्रान्समध्ये कोरोना चाचणी होणार मोफत
Next Article डी. के. शिवकुमार यांच्या चौकशीला स्थगिती नाहीच








