ऑनलाईन खास समेत शॉपिंग सेंटरला कै . सुधाकर बुटाला यांच्या नावाचाही ठराव मंजूर
प्रतिनिधी /खेड:
शहरातील एकविरा नगर येथील नगरपरिषदेच्या दवाखान्यास शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे तर कोविड सेंटरला कै. उषाताई हिराचंद बुटाला यांचे नाव देण्याचा ठराव नगरपरिषदेच्या खास ऑनलाईन सभेत सर्वानुमते समंत करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रूग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता नगरपरिषद दवाखान्यात काविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. सेंटरमधील तांत्रिक बाबींच्या पुर्ततेनंतर पूर्ण क्षमतेने कोरोनाबाधित रुग्णांनावर उपचार केले जाणार आहेत. या दवाखान्यासह कोविड सेंटरला नावे देण्याचा विषय नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सभागृहासमोर ठेवल्यानंतर सर्वानुमते दोन्ही नाबांचे ठराव मंजूर करण्यात आले.
शहरातील शंकराच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यास कै. सुधाकर बुटाला यांचे नाव देण्याचा विषय कामकाज पत्रिकेवर होता. मात्र, या रस्त्याला कै. बुटाला यांचे नाव देण्यापेक्षा नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरला त्यांचे नाव देण्याची सूचना सेनेचे नगरसेवक बाळा खेडेकर यांनी मांडली. गटनेते प्रज्योत तोडकरी यांनी अनुमोदन दिल्यानंतर हा ठराव देखील ऐनवेळी मंजूर करण्यात आला. नगरपरिषदेच्या कामगार संघटनेकडून आलेल्या सानुग्रह अनुदानाबाबतच्या प -स्तावावर देखील चर्चा झाली. त्यानुसार प्रत्येकी २५ हजार रूपये अनुदान देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या ऑनलाईन सभेत झालेल्या चर्चेत सेना गटनेते प्रज्योत तोडकरी, शहर विकास आघाडीचे गटनेते भूषण चिखले, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, नगरसेवक विश्वास मुधोळे, नगरसेविका नम्रता वडके, सीमा वंडकर, अल्पिका पाटणे यांनी सहभाग नोंदवला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









