वार्ताहर / मौजेदपोली
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. जो मास्क वापरणार नाही त्याला ५०० रूपयांचा दंड करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले असल्याने दापोलीत आतापर्यंत १४ जणांवर कारवाई करण्यात आली.
कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. रत्नागिरीत रूग्ण सापडून आल्यामुळे खबरदारी म्हणून मास्क वापरण्याबाबत नियम कडक करण्यात आले. तरी देखील नागरीक मास्क न वापरता फिरत आहेत. यामुळे महसूल विभाग, दापोली नगरपंचायत, पोलीस अशी संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. दापोली नगरपंचायतीच्या पथकाने फेब्रुवारी महिन्यात १४ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून पत्येकी ५०० रूपयांचा दंड वसूल केला. अजूनही मास्क नाही म्हणून पथकाने पकडल्यावर काहीजण वाद घालतात. तसेच शासनाचे नियम अनेकजण धाब्यावर बसवत असल्याचे चित्र दापोलीत आहे.









