दिलेल्या वेळेआधी पुलावरून वाहतूक सुरू – आमदार भास्कर जाधव
जुना पूल तोडण्यासाठी 15 जून ते 30 जून पुलावरील वाहतूक राहणार बंद
गुहागर / प्रतिनिधी सत्यवान घाडे
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोडका घर धरणावरील गेले दोन वर्षे सुरू असलेले पुलाचे काम पूर्ण होऊन 11 जूनपासून या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी ठेकेदाराकडून सदर पुलावरून वाहतूक सुरू करण्याची 15 जून रोजीची तारीख घेतली होती याप्रमाणे ठेकेदाराने दिलेला वेळ आधी पुलावरून वाहतूक सुरू केल्याबद्दल ठेकेदाराबरोबर राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले
यावेळी बोलताना आमदार जाधव यांनी राष्ट्रीय महामार्गावरील अनेक पुलांबाबत अनेक आश्वासने दिली जातात परंतु या पुलावरून 15 जून पर्यंत वाहतूक सुरू होईल असे आपण गुहागर तालुक्यातील जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे असे म्हणाले. 24 एप्रिल 2020 पासून या पुलाच्या कामाला सुरुवात झाली आज या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे दोन्ही साईडला जोड रस्ता तयार करून एकेरी वाहतूक सुरू केले आहे यामुळे तालुका वासियांना गुहागरकडे जाणारा मार्ग हा सुखकर बनला आहे.
या सुरू झालेल्या पुलाचे आमदार जाधव यांनी आज पाहणी केली आणि लवकरात लवकर पुलापासूनचे सुरू असलेले रस्त्याचे कामही पूर्ण करावे अशा सूचना ठेकेदाराला दिल्या. धरणावरील जुना पूल पुन्हा धोकादायक ठरल्याने 2019 पासून बंद होता त्याशेजारी नवीन पूल झाल्याने जुना पूल तोडण्यात येणार आहे त्या फुलाच्या ठिकाणी भराव करून रस्ता तयार केला जाणार आहे यामुळे 15 जून ते 30 जून पर्यंत वाहतूक बंद करावी अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांनी यावेळी केली यालाही उपस्थितांनी संमती दिल्याने 30 जून पर्यंत या पुलावरून वाहतूक बंद राहणार आहे पुलापासून गुहागरकडे दोन किलोमीटरच्या रस्ता कॉंक्रिटीकरण सुरू केले असून या रस्त्याची एक बाजू पुढील पंधरा दिवसात पूर्ण करून त्यावरून वाहतूक सुरू केली जाईल असेही यावेळी ठेकेदाराने सांगितले.