प्रतिनिधी / गुहागर
गुहागर तालुक्यातील अंजनवेल समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी गेलेली श्री गणेश कृपा या मच्छिमारी बोटी ला खवळलेल्या लाटांच्या माऱ्याने समुद्रामध्ये जलसमाधी मिळाली आहे. सदर घटना रविवारी सकाळी 9:30 वाजता च्या दरम्यान घडली असून बोटीवरील सर्वजण सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले आहेत.
गुहागर तालुक्यातील धोपावेतील ज्ञानेश्वर भोरजी यांच्या मालकीची ती बोट होती. रविवारी सकाळी 7:30 वाजता अंजनवेल येथून आपल्याबरोबर सात खलाशांना घेऊन मच्छीमारीसाठी बोट समुद्रामध्ये निघाली. अंजनवेल च्या लाईट हाऊस समोरील भागात समुद्रातील अजस्त्र लाटांनी या बोटीला दणके द्यायला सुरू केले. यामध्येच लाटांचे पाणी बोटीमध्ये शिरल्याने बोटीतील इंजिन बंद पडले बंद पडलेल्या इंजिनमुळे बोटीला वाचवता आले नाही. अखेर संपूर्ण बोट पाण्यामध्ये बुडून तिने जलसमाधी घेतली. यावेळी बोटीवरील आठ जणांनी बोटीतील मिळेल त्या साहित्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला.
यातील सहा जणांनी पोहत पोहत अंजनवेल चा गोपाळगड किल्ल्याचा किनारा गाठला. दोघेजण बोटीच्या फळीच्या साह्याने समुद्रामध्ये पोहत राहिले. अशावेळी मच्छीमारीसाठी गेलेल्या दुसऱ्या गोष्टीतील खलाशांच्या संपर्क साधण्यात आला. त्या बोटीच्या साह्याने समुद्रामध्ये पोहत असलेल्या दोघांना वाचवण्यात आले. बोटीतील वाचलेले घोटी मालक ज्ञानेश्वर भोरजी, राजेश भोरजी , उदय दाभोळकर, रोहिदास भोरजी, जयदास भाटकर, तुकाराम पालशेतकर, जगन्नाथ पवार, प्रणित दाभोळकर हे सुखरूप किनाऱ्यावर परतल्या आहेत. सुमारे 25 लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गुहागर पोलिसांनी सदर घटनेची माहिती घेऊन सुखरूप आलेल्या खलाशांची माहिती घेतली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









