प्रतिनिधी / रत्नागिरी
यावर्षी भारतातून दिसणाऱ्या एकमेव सुर्यग्रहणाचा आनंद रत्नागिरीतल्या खगोल प्रेंमींनी लुटला. रत्नागिरीतही आजचे हे सुर्यग्रहण पहाता आले.
सकाळी ढगाळ हवामान असल्याने रत्नागिरीत सुर्यग्रहण दिसणार कि नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र सुर्यग्रहण सुरु होण्याआगोदर झालेल्या पावसानं ढगाळ हवामानात अचानक बदल झाला. त्यामुळे हे ग्रहण रत्नागिरीतल्या खगोलप्रेमींनी विविध उपकरणांचा वापर करुन या खंडग्रास सुर्यग्रहणाचा आनंद लुटला. साडे अकरा वाजता खंडग्रास सुर्यग्रहणाचा परमोच्च बिंदू पहायला मिळाला. त्यानंतर ग्रहण सुटायला सुरूवात झाली.









