हिंडलगा : हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया रक्षक कॉलनी, विजयनगर येथील वॉर्ड क्र. 10 मध्ये नुकताच काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे उद्घाटन ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर व उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या हस्ते फीत कापून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. गेल्या बऱयाच वर्षांनंतर रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. तर ग्रा. पं. सदस्य डी. बी. पाटील, अध्यक्ष नागेश मन्नोळकर व माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर यांनी मनोगत व्यक्त कले. यावेळी ग्रा. पं. सदस्य एन. एस. पाटील, सदस्या कांचन साठे, लक्ष्मी परमेकर, रेणुका भातकांडे, बी. एल. पाटील, प्रकाश पाटील, बळवंत झेंडे, सुनील शिंदे, सुरज करडे, बाळकृष्ण दफेदार, उल्लाळ, शंकर पुजारी, संजय यादव, परशराम कुंभार, मारुती जाधव, चिल्लाळ, सदानंद शिंदे, बी. एस. पाटील, संजू गावडा, संतोष साठे यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अरुण हरेर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









