वारणानगर / प्रतिनिधी
मसुद माले ता. पन्हाळा येथील हॉटेलवर रंगपंचमी निमीत्त ठेवलेला रंगोत्सव कार्यक्रम लवकर बंद केल्याच्या रागातून हॉटेल मालकाच्या भावास कोडोली ता. पन्हाळा येथील आशिर्वाद मेटलच्या दुकाना समोरील रस्त्यावर मोटर सायकल वरून पाडून त्यास धारदार शस्त्राने,लोखंडी गज, बेसबॉल स्टपने मारहान करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी नऊजनासह अनोळखी सहा व्यक्तीवर कोडोली पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
मारहाणीत गंभीर जखमी झालेला व सद्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विजयकुमार रमेश चौगुले वय २८ रा. माले याने याबाबत फिर्याद नोंदवली आहे. सोमवार दि. १३ रोजी दुपारी ३ वा. घडलेल्या घटनेची माहिती पोलीसानी आज मंगळवार दि. १४ रोजी रात्री दिली.
याप्रकरणी सागर पाटील, प्रदिप काशिद,पृथ्वीराज मगदुम,दिग्वीजय शिनगारे, विक्रम काशिद,जुबेर नदाफ, अक्षय काशिद,अवदुत चव्हाण, प्रतिक माळी, सुमित पाटील व अनोळखी पाच ते सहा इसम सर्व रा. कोडोली ता. पन्हाळा यांचेवर गंभीर दुखापत करण्याबरोबर फिर्यादीचे सहा तोळे सोने चोरीला गेल्याचा गुन्हा देखिल दाखल आहे. फिर्यादी विजयकुमार चौगुले हे बँकेत ठेवलेले गहाण सोने सोडवून घरी जात असताना ही घटना घडली. भावाचे हॉटेल असल्याने अधून मधून ते हॉटेलवर मदतीसाठी जात असतात रंगपंचमी दिवशी झालेला सदरचा वाद तक्रारदार यांचे भाऊ शशिकांत चौगुले व कोडोली गावातील प्रतिष्ठीत लोकांनी मिटवला होता तरी देखील दुसऱ्या दिवशी हा समुहिक हल्ला फिर्यादी विजयकुमार यांचेवर होऊन त्यात ते गंभीर जखमी झाले.
फिर्यादी विजयकुमार यांचे चुलत भावाचे हॉटेल असून तक्रारदार हे हॉटेलवर कधी कधी मदतीस जात असतात रविवार दि.१२ रोजी तक्रारदार यांचे भावाचे हॉटेलवर रंगपंचमीचे निम्मी रंगोत्सव कार्यक्रम ठेवलेला होता सदर कार्यक्रमास फिर्यादी हे गेलेले होते. दुपारी १२.३० वाचे सुमारास यातील आरोपी दिग्वीजीय शिनगारे, विक्रम काशिद हॉटेलवर आलेले होते फिर्यादी यांचे भावाने सायंकाळी ५.३० वाचे सुमारास रंगोउत्सोवाचा कार्यक्रम बंद केला. त्यावेळी कार्यक्रम का बंद केला म्हणुन आरोपीत यांनी त्यांचेशी हुजत घातली व जातेवेळी हॉटेलवर आलेल्या उमेश जाधव याचे कपाळावर पृथ्वीराज मगदुम याने दगड घेवुन मारहाण केली होती. या प्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक एस.ए. डोईज्ञड, फौजदार सागर पवार तपास करीत आहेत.