प्रतिनिधी /बेळगाव
दरवषीप्रमाणे यावषीही येळ्ळूर येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 वे साहित्य संमेलन रविवार दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. साहित्य संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे हे होते.
साहित्य संमेलनाची परंपरा खंडित न करता साहित्य संमेलन दोन सत्रामध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या सत्रात अध्यक्षीय भाषण, दुसऱया सत्रात हास्यदरबार हा विनोदी कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले आहे. श्री शिवाजी विद्यालयामध्ये साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत हे साहित्य संमेलन होणार आहे.
कोरोनाचे नियम पाळत साहित्य संमेलन घेतले जाणार आहे. येळ्ळूर साहित्य संमेलनाला अनेक ज्येष्ट साहित्यिकांनी तसेच ज्येष्ट अभिनेत्यांनी भेट दिली होती. मात्र, कोरोनामुळे मागील वषीपासून साहित्य संमेलन आयोजन करणे अवघड झाले आहे, अशी खंत प्रा. सी. एम. गोरल यांनी व्यक्त केली. पण मराठी भाषेची ही चळवळ सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. संघाचे सचिव डॉ. तानाजी पावले यांनी मागील वषीचा जमा-खर्च सादर केला. या बैठकीला परशराम बिजगरकर, सुभाष मजुकर, कृष्णा टक्केकर, परशराम धामणेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









