इस्लामपूर / प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथे अभ्यासिका, कराटे प्रशिक्षण वर्ग यासह विविध लोकोपयोगी विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील या उपक्रमांचा सर्वांना उपयोग होईल. नव्याने उभारलेली अभ्यासिका तरुण पिढीच्या करिअरला निर्णायक वळण देईल. असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केले.
गावातील १२५ मुलींना कराटे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वसंरक्षणासाठी सक्षम केले जात आहे, हे उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी आपण ‘माझी शाळा, आदर्श शाळा’ हा उपक्रम जिल्ह्यात राबवत आहोत. येडेनिपाणी गावातील लोकांनीही यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा. असेही पालकमंत्री म्हणाले.









