प्रतिनिधी / बेळगाव
म. ए. समितीची बैठक रविवारी जत्तीमठ येथे झाली. बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके होते.
मनपासमोर लावलेला अनधिकृत ध्वज काढण्यास टाळाटाळ करणाऱया व मराठा मंडळ महाविद्यालयात महाराजांचा लावण्यात आलेला बॅनर काढण्यासाठी दबाव आणलेल्या प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
कार्याध्यक्ष सूरज कुडूचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर व सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, चिटणीस अभिजीत मजुकर व सागर पाटील, खजिनदार मनोहर हुंदरे, उपखजिनदार विनायक कावळे, हिशेब तपासणीस वासू सामजी, प्रवक्ता अश्वजीत चौधरी व मनोज पाटील, सोशल मीडिया प्रमुख साईनाथ शिरोडकर, उपप्रमुख सुधीर शिरोळे, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सिद्धार्थ चौगुले, प्रदीप पाटील, प्रवीण कोरणे, अजय सुतार व इतर कार्यकारिणीची निवड केली.
यावेळी मोठय़ा संख्येने सदस्य उपस्थित होते.









