ऑनलाईन टीम / मास्को
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यामध्ये सुरक्षा खात्री योजनेसंदर्भात लवकरच चर्चा होणार असल्याची बातमी आहे. सदरची चर्चा याच महिन्यात होणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. युपेन संदर्भातील संकट दूर करण्यासाठी उभय देशांमध्ये सुरक्षा खात्री योजनेअंतर्गत पुन्हा एकदा चर्चा होणार आहे.
राष्ट्रपती कार्यालयाकडून सदरच्या प्रलंबित प्रश्नाबाबत याच महिन्यात सविस्तर चर्चेद्वारे मार्ग काढला जाण्याची शक्मयता सांगितली जात आहे. गेल्या 7 डिसेंबरला दोन्ही नेत्यांची युक्रेनसंदर्भात व्हिडिओकॉलद्वारे चर्चा झाली होती. सध्याच्या घडीला रशिया या प्रश्नावर चर्चेसाठी पुन्हा तयार झाली असल्याचीही बाब स्पष्ट झाली आहे. सुरक्षा खात्री योजनेवर चर्चा करण्यासाठी उप विदेश मंत्री सर्गेई लावरॉव कोणत्याही तटस्थ देशांमध्ये जाण्यासाठी तयार झाले असल्याचे सांगितले जात आहे. युक्रेनमध्ये परिस्थिती शांतीपूर्ण राखण्यासाठी सुरक्षा खात्री ठरावावर चर्चा होऊ शकते. रशियातील राष्ट्रपती कार्यालयाकडून रशिया युपेनवर हल्ला करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.









