वृत्तसंस्था/ हेलसिंकी
2022 फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी सध्या सुरू असलेल्या पात्र फेरीच्या लढतीत युक्रेनने फिनलँडच्या 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
शनिवारी झालेल्या पात्र फेरीच्या सामन्यात पूर्वार्धात युक्रेनतर्फे अँड्रे येरमोलेंको आणि रोमन येरेमचुक यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. फिनलँडतर्फे एकमेव गोल तेमु पुकीने नोंदविला. आता या पात्र फेरीच्या स्पर्धेतील ड गटात युक्रेनचा संघ 8 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. या गटात फ्रान्स 12 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. फिनलँड आणि कझाकस्तान यांनी प्रत्येकी 5 गुण मिळविले आहेत.









