वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आधारकार्डशी संबंधीत काही अडचणी आणि तक्रारींना आता काही मिनिटात उत्तर मिळणार आहे. आधार वापरकर्त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडीएआय) ‘आस्क आधार चॅटबोट’ सादर केले आहे. यामुळे वापरकर्त्यांना आधारकार्डशी संबंधीत तक्रार आणि प्रश्नांना तत्काळ उत्तर मिळणार आहे.
चॅटबोट एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे, जे चॅट इंटरफेसद्वारा काम करत असून, आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (एआय) मदतीने ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहे. केंद्र सरकारने 2010 मध्ये यूनिक आयडेंटिफिकेशन ऍथोरिटी ऑफ इंडियाच्या मार्फत आधार लागू केले आहे. आत्तापर्यंत सुमारे 125 कोटी लोकांनी आधारची नोंदणी केली आहे. काही सरकारी योजना आणि कागदपत्रांसाठी सरकारने आधारला बंधनकारक केले आहे. त्यामुळे आधारबाबत बऱयाच जणांना निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी नव्या सुविधेचा वापर सोयीस्कर होणार आहे.








