प्रतिनिधी / बेळगाव :
भरधाव मोटारसायकलची ऊसवाहू ट्रक्टर-ट्रेलरला धडक बसून पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमकनमर्डीजवळ गुरुवारी झालेल्या अपघातात कडोली (ता. बेळगाव) येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर आणखी एक तरुण जखमी झाला. यमकनमर्डी पोलीस स्थानकात या घटनेची नेंद झाली आहे.
किरण यशवंत बजंत्री (वय 20) रा. कडोली असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या किरणला तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचण्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता.
या अपघातात अशोक सुरेश मॅगीरी (वय 23 रा. बंबरगा) हा जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. केए 22 ईए 7374 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून कामासाठी हत्तरगी टोलनाक्याकडे जाताना यमकनमर्डीजवळ हा अपघात घडला आहे. हुक्केरीचे मंडल पोलीस निरीक्षक गुरुराज कल्लनशेट्टी पुढील तपास करीत आहेत.









