मिशन ऍडमिशन
प्रतिनिधी /सातारा
दहावीचा निकाल लागताच आता महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांतर्फे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थी व पालकांची सध्या पुढील प्रवेश प्रक्रिये करीताची लगबग सुरू आहे. यातच यंदाचा इयत्ता दहावीचा निकाल ही 99.92 टक्के इतका लगला आहे. पहिल्यांदाच जिल्हय़ाचा निकाल इतका विक्रमी लागला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महाविद्यालयांतर्फे ही प्रवेशाकरीताचे मार्क (कट ऑफ) वाढविण्याची दाट शक्यता आहे.
सध्या सर्व महाविद्यालयांमध्ये अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर या आर्जाची छाननी प्रक्रिया करून कटऑफ मार्कस लावण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रवेश मिळविण्याकरीता पात्र विद्यार्थ्यांची यादी ही महाविद्यालयांतर्फे त्यांच्या इयत्ता 10 वीतील गुणांसहित जाहीर करण्यात येणार आहेत. मागील वर्षी विज्ञान शाखेत प्रवेश मिळविण्याकरीता कट ऑफ टक्के 80 टक्यांपर्यंत होते. त्यानुसार 80 टक्याच्या पुढे गुण मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होता. पण यंदा मात्र या टक्यांमध्ये वाढ होऊन 85 टक्यांपर्यंत जाण्याची दाट शक्यता महाविद्यालयांकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच वाणिज्य शाखेचा कट ऑफ 58 टक्के इतका होता यंदा 60 टक्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
कारण यंदा दहावी निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांना विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याकरीता इच्छुक असतात. पण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची शक्यता ही मर्यादित असते. त्यामुळे यंदाच्या दहावी निकालाचा परिणाम हा विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिसाठीच्या कट ऑफ मध्ये दिसुन येणार हे मात्र नक्की, काही पालक वर्गांचीतर आपापल्या पाल्यांना संबंधीत महाविद्यालयात प्रवेश मिळावा याकरीता आत्ता पासुनच मोर्चे बांधनी सुरू आहे.