प्रतिनिधी/ सातारा
कोरोना आणि लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, अनेक इयत्तांचा अभ्यासक्रम ही पुर्ण झाला नाही. त्यामुळे यंदा एप्रिल महिन्यात ही शाळा सुरू राहण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे. जवळपास 15 दिवसांच्या सुट्टय़ावर पाणी फिरणार आहे. त्यामुळे पालकांच्या व विद्यार्थ्याचे सुट्टीचे नियोजन ही कोलमडणार आहे.
अपुर्ण अभ्यासक्रम पुर्ण करण्याच्या दृष्टीने यंदा या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. मागील वर्ष हे संपुर्ण पणे कोरोना मुळे ऑनलाईन शिक्षण पध्दतीत गेले. परंतु ऑनलाईन शिक्षण पध्दतीला ही मर्यादा असल्याने अभ्यासक्रम हा पुर्ण होऊ शकला नाही. यंदा ही जवळपास डिसेंबर महिन्यापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातुन अभ्यासक्रम सुरू होता. आता सर्व काही सुरळीत झाल्याने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यंदाचा मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताच परिणाम होवु नये याकरीता एप्रिल महिन्यापर्यंत शाळा सुरू ठेवण्यात येणार आहेत.
पहिली ते नववी आणि आकरावीच्या विद्यार्थ्यांची शाळा एप्रिल अखेरपर्यंत सुरू ठेवुन वार्षिक परिक्षा एप्रिल अखेर घ्याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करावा, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढल्याने सर्वच पालक संतप्त झाले आहेत. या नव्या वेळपत्रकाने विद्यार्थ्यांसह पालकांच्याही उन्हाळी सुट्टय़ांचे प्लॅन चांगलेच धोक्यात आले आहेत.
शाळांचे नियोजन ही कोलमडले
प्रतिवर्षी 15 मार्चपासून शाळा एकवेळ सुरू होतात. मोठय़ा शाळा दोन सत्रात चालतत एप्रिल मध्यापर्यंत शाळांच्या पातळीवरील परिक्षा आटोपतात आणि मुलांना सुट्टी लागते. तसेच 1 मे रोजी निकाल लागतो. पण यंदा मात्र से सर्व नियोजन चांगलेच कोलमोडले आहे.
विद्यार्थी व पालकांमध्ये निराशा
मागील दोन वर्षे कोरोना आणि लॉकडाऊन मुळे सर्वांनाच सुट्टी संबंधीचे कोणतेच नियोजन करता आले नव्हते. आपापल्या घरातच बंधिस्त रहावे लागले होते. पण यंदा मात्र अनेक विद्यार्थी व पालकांनी आपापल्या पाल्यांच्या शालेय सुट्टींवर आधारीत बाहेर जाण्याचे नियोजन केले होते. पण यंदा ही अनेकांच्या नियोजनांवर पाणी पडले असुन विद्यार्थी व पालकांमधुन निराशा व्यक्त करण्यात येत आहे.
पुर्णवेळ शाळा सुरू राहणार
शासन निर्णया नुसार यंदा एप्रिल महिन्यात ही शाळा पुर्णवेळ सुरू राहणार आहेत. तसेच एप्रिल महिन्याच्या तीसऱया आठवडय़ात परिक्षा घेण्यात येणार आहेत. तसेच दिवस भराच्या जितक्या तासिका असतात त्या पुर्ण करणे ही बंधनकारक असुन ज्यांना रविवारी ही शाळा घ्यावयाच्या त्यांना रविवारी ही शाळा सुरू करण्यास मुभा देण्यात आल्या आहेत.









