प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मराठा मंदिर येथे सुरू करण्यात येत असलेल्या आयसोलेशन सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या शुक्रवारपासून हे सेंटर रुग्णांसाठी खुले केले जाणार आहे. या आयसोलेशन सेंटरच्या उभारणीसाठी समाजाच्या विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
बांधकाम व्यावसायिक आर. एम. चौगुले यांनी 10 बेड आणि 25 हजाराची रोख देणगी दिली आहे. याशिवाय संजीवनी फौंडेशनने 10 बेड आणि 10 हजार रुपये, शनैश्वर एज्युकेशन ट्रस्टने 10 बेड तर रिचल भोसले यांनी 10 बेडची व्यवस्था केली आहे. बेळगाव रेल्वेस्टेशनवरील तिकीट तपासणीकांनी एकत्रित येवून या सेंटरसाठी आर्थिक मदत केली आहे. टीसी सुनील आपटेकर यांनी ही मदत समितीच्या पदाधिकाऱयांकडे सुपूर्द केली.









