बेंगळूर/प्रतिनिधी
शुक्रवारी म्हैसूरमध्ये म्हैसूर-मंगळूर दरम्यानच्या थेट विमान सेवेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. ही सेवा बुधवार, शुक्रवार, शनिवार व रविवारी असेल.
दरम्यान एअर इंडिया लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी एलायन्स एअर चालवणार आहे. हे विमान सकाळी ११.२० वाजता म्हैसूर येथून सुटेल आणि मंगळूरला दुपारी १२.३० वाजता पोहोचेल. परतीच्या दिशेने एलायन्स एअर फ्लाइट एआय ९५३३ मंगळूरहून दुपारी १२.५५ वाजता सुटेल. आणि सकाळी १.५५ वाजता म्हैसूर येथे उतरेल.
नवीन उड्डाण सुरू झाल्यावर, म्हैसूर विमानतळावरून हवाई हालचालींची संख्या १४ वर पोहचेल. सध्या विमानतळातून बेंगळूर, बेळगाव, चेन्नई, हैदराबाद, गोवा आणि कोचीला जाण्यासाठी सेवा उपलब्ध आहे.
उद्घाटनानंतर म्हैसूरचे खासदार प्रताप यांनी या उड्डाण सेवेमुळे म्हैसूरला पर्यटन विकासाला चालना मिळण्याबरोबरच आणखी गुंतवणूक होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.









