बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक मंत्रिमंडळाने गुरुवारी म्हैसूर शहराच्या परिघावर आलेल्या अनेक नवीन महसूल आराखड्यांचा समावेश करून चार नवीन नगरपंचायती आणि नगरपरिषद स्थापण्यास मान्यता दिली.
मंत्रिमंडळाने बोगडी, श्रीरामपूर, कडकोळ आणि रामनहळ्ळी ग्रामपंचायती आता नगरपंचायती असतील. शहराच्या बाहेरील भागात हिंकळ,
कोरगळ्ळी, बेळवडी आणि हूतगळ्ळी या नवीन नगरपरिषदा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती म्हैसूर-कोडगूचे खासदार प्रताप यांनी दिली आहे.









