काकती पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
म्हाळेनट्टी (ता. बेळगाव) येथील एका युवकाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
प्रकाश महादेव पाटील (वय 34, रा. म्हाळेनट्टी) असे त्याचे नाव आहे. बुधवार दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 यावेळेत ही घटना घडली आहे. प्रकाशचे वडिल महादेव पाटील यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
रामचंद्र नाईक यांच्या शेतातील धामणीच्या झाडाला गळफास घेऊन प्रकाशने आपले जीवन संपविले आहे. दोन दिवसांपूर्वी त्याची पत्नी मुलांना घेवून माहेरी गेली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर पुढील तपास करीत आहेत.









