नवी दिल्ली \ . ऑनलाईन टीम
कोरोनासह काळ्या आणि पांढऱ्या बुरशीचा आजारही देशभरात थैमान घालताना दिसत आहे. आतापर्यंत हजारोंना याची लागण झाली आहे. मात्र, ब्लॅक फंगस आजार स्पर्शाने पसरत नाही. तसेच या आजाराला वेगळ्या रंगांवरून नवीन ओळख देऊ नये, अशी सूचना एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केली आहे.
एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, ब्लॅक फंगस आजार स्पर्शामुळे पसरत नाही. तसेच वेगळ्या रंगांवरून याला ओळख देण्यात काहीच अर्थ नाही. तसेच ब्लॅक फंगस आजार होऊ नये, यासाठी स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे. घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच पाणी उकळूनच प्यावे. तसेच नाकात दुखणे किंवा घसा खवखवणे, पोटात दुखणे अशी काही लक्षणे ब्लॅक फंगस आजाराची समोर आली आहेत. रंगांपेक्षा लक्षणांवर भर देऊन शक्य तितक्या लवकर उपचार करण्यावर भर द्यावा, असे त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
Previous Articleकोल्हापूर : इचलकरंजीत दिवसाआड वॉर्ड राहणार बंद
Next Article जेधे फाऊंडेशनने 1600 जणांना दिली भोजन सेवा









