प्रतिनिधी / शिरोळ
बेकायदेशीर पानमसाला व तंबाखू पदार्थाचा साठा केल्याप्रकरणी मौजे आगर (ता शिरोळ )येथील लियाकत बाबासो गवंडी वय 37 याच्या विरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याच्याकडून 41 हजार 958 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, शिरोळ – जयसिंगपूर मार्गावरील आगर फाटा कमानीजवळ लियाकत गवंडी याच्याजवळ विमल पान मसाला लिहिलेले पाऊच, स्टार पान मसाला व एक मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, बुधवारी दुपारी अडीच वाजन्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली, याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक सरनाईक यांनी दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









