वार्ताहर/ शिखरशिंगणापूर :
अनेक जण सेवानिवृत्त झाल्यावर अगदी सामान्य रुटीन जीवन जगणे पसंत करतात पण मोही ता माण येथील शिवाजीराव देवकर या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्ताने माळाचा मळा केला आहे आम्रवनाला भेट द्यायला येणारे सहज बोलून जाताहेत मोहिच्या माजी फौजदाराने फुलवला आंब्याचा मळा तर फौजदार पत्नी बनल्या 1000 झाडांची आई
मोही सारख्या ग्रामीण भागात 1973 मध्ये शिक्षणाची सोय नव्हती 9 वी शिक्षण घेऊन मुबंई गाठली तिथे जुनी 10,11 शिक्षण पूर्ण केले 15 फेबुरवरी 1975 ला पोलीस यंत्रणेची धुरा स्वीकारली काळाचौकी, घाटकोपर, वाकोला, खिदवाडी, वडाळा,येथे कर्तव्यदक्ष मुबंई पोलीस म्हणून सेवा केली पोलीस दलात कार्यरत असल्याने स्व इंदिराजी गांधी, स्व अटल बिहारी वाजपेयी, स्व बाळासाहेब ठाकरे, सारख्या दिगग्ज नेत्यांचे सानिध्य जवळून लाभले तर क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर, अभिनेते मिलिंद गुणाजी, जेष्टपत्रकर कुमार केतकर,उत्कृष्ट साहित्यिक य दी फडके, व पू काळे, विजयाराजाध्यक्ष, गिरीजा किर , अशा व्यक्तिमत्वाचा सहवास खूप काही शिकवून गेला पोलीस प्रशासनातील करारी,शिस्तप्रिय,आधिकारी डी एन जाधव पुसेगाव, गुलाबराव पोळ मार्डी, सदानंद दाते पुणे, आदींचे प्रभावी मार्गदर्शन लाभले त्यांच्या मार्गदर्शनातून इमाने इतबारे मुबंईपोलीस दलात सेवा केली दरम्यान एक मुलगा परदेशात जाऊन आला तर दुसरा वकिली व्यवसायात उत्तम नाव कमवून आहे उत्तम संस्कार करीत दोन्ही मुले स्वावलंबी बनवलेली आहेत नोकरीतील दांडगा अनुभव आणि कर्तव्य तत्परता यामूळे मुबंई फौजदार म्हणूनच सेवानिवृत्त झालो
ङसेवा निवृत्ती नंतर काळ्या आईची सेवा हाच संकल्पङ
2012 मध्ये सन्मानाने सेवानिवृत्त झालो सेवानिवृत्ती नंतर अनेकांना यक्ष प्रश्न पडतो तो म्हणजे पुढे काय करायचं..? वेळ कसा घालवायचा ? पण देवकर साहेबांनी सेवेत असतानाच गावी जाऊन धरती मातेची,काळ्या आईची सेवाकरण्याचा संकल्पच केला होता त्यानुसार गावाकडचे माळरान फुलविण्याचे आव्हान त्यानीं स्वीकारले जमीन माळरान नीट करणे,सपाटी करणं, पाण्याची सोय, खत, त्या अंनुशंगाने सर्वच आव्हाने समोर उभारली पण पोलिसी खात्यातील अंदाज आणि निर्धार यांनी परिस्थितीवर मात कशी करायची हे शिकवलं होत कमी पाण्यात अवर्षण भागात हमखास उत्पन्न देनारे आंब्याचे झाड आठवलं देवकर साहेब व साहिबीणबाई हे सेवानिवृत्त दांपत्य सकाळी 7 वाजता माळरानावर जाऊ लागले 750केशर आंबा, 200 चिंच, 50 चिक्कू, त्यापुढे अंजीर ,करवंद वड ,पिपंळ अशी झाडे आज थाटात उभी आहेत विशेष म्हणजे देवकर साहेबांनी झिरो बजेट , व केमिकल्स विरहित पूर्णतया नैसर्गिक शेती प्रयोग राबविला आहे त्यासाठी हे दांपत्य अहोरात्र शेतीमध्ये मनापासून राबत आहे माळ रानात फुलवलेली आमराई पहाण्यासाठी अनेक लोक भेटी देताहेत यावर्षी मिळणारे उत्पन्न साहेबांचा सर्व शिंनवठा घालवणार ,हे संगताना त्यांच्या धर्मपत्नी सौ राधिका देवकर म्हणतात मला 1000 झाडांची आई झाल्याचा आनंद आहे कारण आईच्या मायेनेच मी या झाडांचे संगोपन केले आहे शेतीत केलेल्या कष्टाचे फळ नक्की मिळते याचेच उदाहरण म्हणजे मोही माळावर साहेबांनी फुलवलेली आमराई








