मोरजी/प्रतिनिधी
मोरजी येथील सुप्रसिद्ध घोडेमोडणी गुरुवार 24 रोजी डआज़ व शुक्रवार 25 रोजी डउद्य़ा रंगपंचमी उत्सव साजरा होणार आहे. मोरजी येथील सुप्रसिद्ध घोडेमोडणी उत्सव गुरुवार दिनांक 24 रोजी रात्री साजरा होणार आहे त्यानिमित्ताने मोरजी मर्यादित चित्ररथ स्पर्धा ( फार्स ) वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 25 रोजी रंगपंचमी साजरी करून शिगमोत्सव याची सांगता होणार आहे.
श्री मोरजाई देवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या निसर्गरम्य परिसरातील जनता आज पर्यंत सुख समाधानाने एकोप्याने नांदत आहे. श्री मोर्जाई देवीचा आशीर्वाद घेऊन गावातील सर्व जनता मोठय़ा उत्साहाने गावातील शिगमोत्सव भाग घेत असतात. दरवषी शिगमो उत्सवाची सुरुवात ही होळीच्या दिवसापासून होते. सकाळी हरिजन वाडय़ावर उत्सवाची नोबत केली जाते. नोबत झाल्यानंतर रास्ट्राŸली म्हारिंगण देवाची होळी घातली जाते. ती होळी सावरीची किंवा आंब्याच्या झाडाची असते. होळीची विधिवत पूजा केल्यानंतर गाऱहाणे घातले जाते. नंतर तिथून वाजत गाजत सर्व मंडळी देव सत्पुरुष देवळाकडे जातात. तेथे देवशेठ किंवा परब या घराण्यातील व्यक्ती गार्?हाणे घालून एका व्यक्तीला पगडी बांधून त्याच्या पगडीत आंब्याचा टाळा खोवतात. नंतर गाऱहाणे झाल्यावर गावची होळी घालण्यासाठी मोरजकर यांच्या घराकडे जमतात. त्याठिकाणी पोफळीची भली मोठी होळी सजवून ठेवलेली असते. ही होळी तोडण्या पूर्वी त्या झाडाच्या मुळाकडे पानाचा विडा आणि पैसे ठेवून ती होळी सुतार तोडतो.
हर हर महादेवाच्या गजराती होळी तोडतात आणि मोरजकार यांच्या दारात आणून ठेवली जाते. नंतर ब्राम्हण वाजंत्री मानकरी गावकरी यांच्या उपस्थितीत ती होळी वाजत गाजत नाचत मोरर्जाई देवीच्या देवळाकडे नेतात तिथं किमान दोन ते तीन तास होळी नाचवली जाते.होळी नाचवण्याचा कार्यक्रम रंगतदार आणि अधिक उत्साही असतो. नंतर परब या घराण्यातील मानकरी ती होळी उभी करतो. त्यानंतर ती होळी मानकरी मुळात जाळतात असे हे चारही मानकरी घुमड वाजवून देवाचा माणा मोरजाई च्या देवळात आणतात व तीर्थप्रसाद घेऊन लोक घरी जातात. तिसऱया दिवशी देवाचे रोमाट होते. त्यावेळी विविध प्रकारचे माणे गाऊन भली रोमट म्हणून रोमाट काढतात, चौथ्या दिवशी हरिजन वाडय़ावर श्री देवी म्हारिंगण राष्ट्र आणि या देवाला श्रीफळ ठेवून गाऱहाणे घालतात. तेथून वाजत-गाजत कांनायीक वाडा येथे केशव नाईक यांच्या घरा जवळील मांडय़ावर येऊन रोमाट थांबते. तिथे कपडय़ांची रावटी करून का नाईक या व्यक्तीला पगडी बांधून त्यावर आंब्याचा ताळा खोवतात तयानंतर रामनाथ पवार या जाणकार व्यक्तीकडून गार्?हाणे घालून ची सुरुवात होते नंतर चारही दिवस हे रोमांट घरोघरी फिरते सर्वांच्या घरी गणेश पूजन केले जाते. रोमाट गाव फिरून झाल्यानंतर सातव्या दिवशी कांनायीक वाडय़ावर पुरखे यांच्या घरी मांडावर सगळय़ा रोमटाचा मेळ जमतो. त्याठिकाणी नवस फेडले जातात. तिथून रोमांट नाचत गाजत मोरजाई देवळाकडे घेऊन येतात. येताना वाटेत भेटलेले फणस आंबे केळीचे घड अशा वस्ती घेऊन वस्तू घेऊन त्या सर्व वस्तू देवळाजवळ आणून आणून ठेवता,
आठवी रात्र उत्साहाची असते
आठवी रात्र मोरजाईची होळी माणो म्हणत वाजंत्री रावटी म्हणजे याला चोरीचे रोमाट म्हणतात. हे रोमाट विशिष्ट पद्धतीने नाचवली जाते. यात लहान मुले तसेच जाणकार मंडळी नाचतात. या रोमटात केळीचे घड आंबे फणस मक्मयाची कणसे याची चोरी केली जाते त्या चोरी च्या वस्तू देवळात आणून ठेवतात,त्याच वस्तू घेऊन ही मंडळी नाचत असते.
सुप्रसिद्ध घोडेमोडणी
हतियाचे रोमटामेल प्रसिद्ध असून त्यावेळी श्री देव ब्राह्मण यांच्या स्थळावर विधी करतात त्यांच्या पूर्वी देव ब्राह्मण,देव सत्पुरुषांचा यांचा घोडा नटून ठेवलेला असतो. त्या नंतर ब्राह्मणाला गाऱहाणे घातल्यानंतर तिथून वाजत गाजत देवी मोजायच्या भव्य मंडपामध्ये सुमारे एक ते दोन तास घोडे नाचतात. या वेळी 15 घोडे तसेच व्यक्तीने केलेला फारसा कमीत कमी दोन तास चालतो.
देवीची पालखी झाल्यानंतर वाघ मारण्याची पद्धत असते या कामी देव सत्पुरुषाला गार्?हाणे घालून आव्हान केले जाते. त्यानंतर सर्व लोक शिकारीला जातात वाघाची कातडी पांघरलेल्या माणसाला मारून आणून देवळात सर्व मानकर यांना शिकारीचे वाटे घालतात. या वाटय़ाचा मान शब्दाने पेडणे मामलेदार याला दिला जातो. नवव्या दिवशी धुळवड साजरी केली जाते.त्यावेळी सगळे सगळे माणो म्हणून देवळाभोवती नाचतात, देवीचा कळस पंख डोक्मयावर घेऊन सर्व देवळांना हळदोणी वाटतात. हलदोणी घातल्यानंतर धूळ मारून सर्व लोक समुद्रावर आंघोळ करून पुन्हा देवळाच्या मंडपात येतात आणि शिग्मोत्सवाची उत्सवाची सांगता करतात.









