ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात तयार करण्यात आलेल्या कोरोना लसींचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तीन प्रयोगशाळांच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी ते अहमदाबादला पोहोचले. तेथे त्यांनी जायडस कॅडिलाच्या कारखान्यात दीड तास कंपनीच्या लसीचा आढावा घेतला. आता ते हैदराबादेत दाखल झाले असून, भारत बायोटेकच्या प्रकल्पातील लसींच्या विकासाचा आढावा घेत आहेत.
दुपारी 4 वाजता मोदी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. तेथील संशोधक आणि शास्त्रज्ञांशी ते चर्चा करतील. तसेच लस उत्पादनात केलेल्या प्रगतीचाही आढावा घेतील.









