ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला संबोधित करत केंद्राने संमत केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करत मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. याबाबत देशातुन विजयोत्सव साजरा केला जात आहे. मात्र भाजपच्या गोटातुन याबाबत संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत. यावरुन काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्याणाचे स्वागत केले आहे. या सोबतच लखीमपूर खेरी येथे भाजप नेत्याच्या गाडीखाली चिरडून ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावे अशी मागणी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केली आहे. गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेत ही मागणी केली.
लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. मात्र, भाजप सरकार आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. असा ही आरोप गांधी यांनी यावेळी केला. तसेच पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी प्रियंका गांधी यांनी यावेळी केली.
प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. त्यांनी म्हटले की, गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडल्याचा आरोप आहे. मात्र, भाजप सरकार आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोपींसोबत व्यासपीठावर एकत्र दिसले तर ते शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा संदेश लोकांमध्ये जाईल. पंतप्रधानांचा हा निर्णय 700 हून अधिक शहीद शेतकऱ्यांचा अपमान असेल असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.