संतोष सणगर / पेठ वडगाव
ठरलेले लग्नग्न मोठय़ा खर्चाने करून देण्याच्या मागणी व देण्याघेण्याच्या व्यवहारावरून मोडले आणि प्रकरण पोलीस ठाण्यात आले. नवऱया मुलावर तक्रार दाखल करण्यासाठी मुलीकडील नातेवाईक वडगाव पोलिसात आले. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिकामे होण्यापेक्षा मुलाकडील लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेवून नवरा मुलगा व नातेवाईकांची समजूत काढून मोडलेले लग्नग्न पुन्हा जमविले. नवरामुलाला आयुष्यात आदर्शवादी जगण्याचा सल्ला दिला आणि त्याला पोलिसांनी दिलेला मोलाचा सल्ला पटला लग्नग्नास होकार मिळाला आणि पोलिसांच्या साक्षीने मुलीचा लग्नग्नाचा छोटेखानी समारंभ झाला. मुलीच्या नातेवाईकांनी आणि मुलाकडील नातेवाईकानीही पोलिसांच्या रुपात माणुसकीचा झरा अनुभवला आणि आभार मानले.
पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात लग्नग्न ग्न थाटामाटात आणि देण्याघेण्यावरून मोडले. मुलीच्या नातेवाईकांनी ठरलेले लग्नग्न मोडत असल्याची तक्रार देण्यासाठी वडगाव पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांची बाजू ऐकून घेत मुलाला व त्यांच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
नवरा मुलाला मुलीकडून खर्च आणि मानपानाची अपेक्षा करण्यापेक्षा मुलीचा बाप समजून घे, लग्नग्नात मोठा खर्च करून तू विवाह करून जिच्यासोबत आयुष्याची वाटचाल करणार आहेस. त्या बापालाच कर्जाच्या खाईत लोटणार आहेस. लग्नग्न साधेपणाने करावे. तुझ्या जीवनात नाव कमवायचे आहे. याची सुरवात तू अशी करू नकोस, असे समजावून सांगत थाटामाटात आणि देण्याघेण्यावरून त्याला परावृत्त केले. तर मुलाच्या नातेवाईकांचीही समजूत काढली. मुलाकडील नातेवाईकांना पोलिसांचा विचार पटला आणि लग्नग्नास तयार झाले वाद मिटला. लग्न साधेपणाने करून मुलीला नेण्याचे आणि तिला संसारात नेहमी सुखी ठेवण्याचे वचन नवरा मुलीने पोलिसांना दिले. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस शिपाई दादासो माने, पोहेकॉ. पतंगराव रेणुसे यांनी मुलीचा मोडत असलेला विवाह जमविल्याच्या मोठा आनंद झाला. मुलीच्या आणि मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले. जात धर्म या पलीकडील पोलिस कर्तव्य आणि त्याहीपुढे असलेली माणुसकी अनुभवली.
मुलाच्या नातेवाईकांनी त्यांचा लग्नग्नाच्या खर्चाची अवास्तव अपेक्षा कशासाठी हवी याबाबत प्रबोधन करून त्यांच्या हातून घडत असलेली चूक समजावून देत ही लग्नग्नगाठ पुन्हा जुळविली याबद्दल पोलिसांचे आभार मानले. लग्नग्न लगेचच साध्या पद्धतीने करून मुलीला नेण्यास मुलाकडील नातेवाईक तयार झाले. मुलीचे लग्न वाठार येथील साध्या पद्धतीने पार पाडले. मुला मुलीने पोलीस ठाण्यात येवून पोलीस निरीक्ष प्रदीप काळे व पोलीस शिपाई दादा माने यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पोलिसांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मुलीकडील व मुलाकडील नातेवाईकांना गहिवरून आले. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी ही आमची लेक आहे तिला सुखात ठेव असे नवरा मुलाला सांगत आशीर्वाद दिले. लग्नात अवाढव्य खर्चाची अपेक्षा ठेवणार्या वरपक्षाच्या डोक्यात प्रकाश पडणारी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी तक्रार देण्यासाठी आलेल्या मुलीकडील नातेवाईकांची बाजू ऐकून घेवून दोन मने जुळविण्यासाठी पोलिसांनी बजावलेली भूमिका यामुळे मुस्लीम बांधवानी पोलिसांचे आभार व्यक्त केले. पोलिसातील माणुसकी अनुभविल्याची भावना यावेळी उपस्थित असलेल्या मुस्लीम बांधवानी व्यक्त केली. पोलिसांच्यामुळे जुळण्या आधीच तुटत असलेली लग्नगाठ जुळली आणि हीच गोष्ट लग्नग्नात मुलीच्या पित्याकडून अनेक ठिकाणी अवाढव्य खर्चाची अपेक्षा ठेवणार्या वरपक्षाच्या डोक्यात प्रकाश पडणारी ठरली. पोलिसांनी बजावलेली भूमिका अनेकासमोर आदर्श ठेवून गेली. पोलिसांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल वडगाव परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.