आज वर्ष उलटले तरी आरोपी मोकाट
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरानजीकच्या खेडशी येथील मैथिली गवाणकर हिच्या खूनाचा उलगडा वर्षभरानंतरही रत्नागिरी पोलिसांना करता आलेला नाह़ी मागील वर्षभरात सर्व शक्यतांची पडताळणी रत्नागिरी पोलिसांकडून करण्यात आल़ी मात्र मारेकऱयांबाबत ठोस धोगेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत़ त्यामुळे महाविद्यालयात शिकणाऱया मैथिलीला नक्की कुणी व का मारले, हे प्रश्न याचा शोध अद्याप सुरूच आह़े
खेडशी गवाणकरवाडी येथील मैथिली गवाणकर या 16 वर्षीय तरूणीचा 9 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होत़ा घराशेजारी असलेल्या जंगलमय भागात मैथिली हिचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला होत़ा या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला होत़ा मात्र वर्षभर विविध शक्यता पडताळून पाहून देखील पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आलेले नाह़ी त्यामुळे मैथिली हिचा खून नक्की कोणी केला, याबाबतचे गुढ अद्याप कायम आह़े
मैथिली ही 11 वी मध्ये शिक्षण घेत होत़ी 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास घराशेजारी असलेल्या जंगलमय भागात शेळ्य़ा चरवण्यासाठी गेली होत़ी मात्र सायंकाळी शेळ्या घरी परतल्या, मात्र मैथिली ही उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल़ा यावेळी नातेवाईक व ग्रामस्थ यांनी मैथिली हिचा शोध घेतला असता घरापासून काही अंतरावर असलेल्या जंगलमय भागामध्ये मैथिलीचा मृतदेह आढळून आला होत़ा तिच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आल्याने दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होत़े
मैथिली हिला जवळचा मित्र असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले होत़े त्यानुसार पोलिसांकडून या मित्राचीही कसून चौकशी करण्यात आली होत़ी मात्र घटनेच्या दिवशी तो रत्नागिरीच्या बाहेर होत़ा त्यामुळे या खूनाशी त्याचा संबंध नसल्याचे आढळून आल़े तसेच मैथिली हिच्या अन्य मित्र व मैत्रिणींचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होत़ी
मैथिली हिच्या घरामध्ये जिल्हा शासकीय रूग्णालयातील केसपेपर आढळून आला होत़ा यामध्ये तिने जिल्हा रूग्णालयातील स्त्राrरोग तज्ञाकडे तिने वैद्यकीय उपचार घेतल्याचे समोर आले होत़े मैथिली हिने स्त्रीरोग तज्ञाकडे उपचारासाठी जाण्याचे कारण काय, घटनेमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होत़े मात्र रूग्णालयात उपचारासाठी जात असल्याबाबत तिने आपल्या घरच्यांना कल्पना दिली होत़ी त्यामुळे यातून पोलिसांना फारसे काही निष्पन्न होवू शकले नाह़ी
मैथिली हिच्या खूनाच्या दिवशी तिच्यावर बिबटय़ाने हल्ला केला, अशी अफवा पसरवण्यात आली होत़ी प्रत्यक्षात मैथिली हिचा खून झाला असताना बिबटय़ाने हल्ला केला, ही अफवा कुणी व का पसरवली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत होत़ा मात्र या बाबतही काही ठोस पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाह़ी









