मेलबर्न / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरीत डॅनिल मेदवेदेव्ह, त्सित्सिपस तर महिला एकेरीत द्वितीय मानांकित सबालेंका, सिमोना हॅलेप, एलिसे मेर्टेन्स, डॅनिएले कॉलिन्स यांनी दमदार विजय संपादन केले. पुरुष एकेरीत मेदवेदेव्हने जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित बॉटिक व्हानला 6-4, 6-4, 6-2 अशा फरकाने मात दिली. स्टेफानोस त्सित्सिपसने बेनोईत पेरेला पराभूत केले.
महिला एकेरीत हॅलेपने कोव्हिनिकला 6-2, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये अवघ्या 64 मिनिटांच्या खेळात नमवले. सबालेंकाने व्होंड्रोसोव्हाला 4-6, 6-3, 6-1 असे पराभूत केले. एलिसे मेर्टेन्सने चीनच्या झँग शुआईला 6-2, 6-2 असे नमवले. कॉलिन्सचा क्लॉरा टॉसनविरुद्ध 4-6, 6-4, 7-5 फरकाने मिळवलेला विजयही लक्षवेधी ठरला. बर्थडे गर्ल ऍलिझ कॉर्नेटने स्लोव्हेनियाच्या झिदॅन्सेकला 4-6, 6-4, 6-2 असे नमवले.









